
मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत प्रेम संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन युवतीवर केला अत्याचार, चिपळूण मधील प्रकार
मुंबई पुण्यासारख्या महानगरात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारात वाढ झाली असतानाच आता कोकणातही तसे लोण पसरू लागल्याचे घटना घडत आहेतमायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन युवती प्रेम संबंध ठेवले आणि लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व तिची नंतर फसवणूक केली
चिपळूणशहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन युवतीवर प्रेम संबंध ठेवल्यावर लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीचे दुसरीकडे बदली झाली त्याचे दुसऱ्या तरुणी बरोबर प्रेम संबंध जुळले व त्याने तिच्याबरोबर लग्न केले मात्र या तरुणीशी लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खेड न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आदित्य समीर बने (वय २५, रा. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आदित्य हा शहरातील एका मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करत होता. पीडित मुलीच्या आईने याच कंपनीतून कर्ज घेतले होते. कर्ज वसुलीच्या निमित्ताने आदित्यचे पीडितेच्या घरी वारंवार येणे-जाणे होते.
याच ओळखीतून त्याने अल्पवयीन मुलीवर प्रेम संबंध जुळविले व तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी आदित्य बने याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




