
राजापूर शहराचा नन्हेसाहेब पुलाला नवीन झळाळी मिळणार
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असताना शहराचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणार्या जवाहर चौकातील नन्हेसाहेब पुलाचे पालटणारे रूप मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माजी आ. ऍड. सौ. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नाने या पुलाचे सुशोभिकरणाचे काम सुरू असून लवकरच या नन्हेसाहेब पुलाला नवा साज चढणार आहे. त्यामुळे राजापूर शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
राजापूर शहरातील जवाहर चौक व त्याला लागून असलेला कोदवली नदीवरील नन्हेसाहेब पूल आहे. नन्हेसाहेब पूल हा ब्रिटिशकालीन असून आजही भक्कमपणे उभा आहे. या पुलामुळे शहराचे दोन भाग जोडले गेले असल्याने या पुलाला विशेष महत्व आहे. या पुलावर रिक्षा स्टैंड आहे तसेच सायंकाळी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणूनही या पुलाला विशेष पसंती आहे. त्यामुळे या पुलाचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून शहरवासियांतन करण्यात येत होती.www.konkantoday.com




