
धोपेश्वर जिल्हा परिषद गटातून अभिजीत गुरव यांचे नाव चर्चेत
राजापूर : रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठीच्या
नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत राजापूर तालुक्यातील धोपेश्वर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. या गटातून जनतेच्या मनातील उमेदवार भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व सध्या जिल्हा संघटनेत कार्यरत असलेले युवा नेतृत्व अभिजित गुरव यांचे नाव पुढे आले आहे.
त्यांच्या नावाची चर्चा आधी पासूनच होत असताना पक्षाने संधी दिली तर आपला निश्चितच विजय असेल असा दावाही उद्योजक असलेल्या भाजपा पदाधिकारी श्री. गुरव यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चार वर्ष भूषविताना त्यांनी पक्षसंघटनामक दृष्टीने या विभागातील जनतेच्या सुख दु:खाचा वाटेकरी होत अगदी तळमळीने काम केले आहे.
कोणताही प्रसंग असो श्री. गुरव यांना माहिती मिळताच काही क्षणात घटनास्थळी दाखल होऊन सर्वोतोपरी मदत करणारे
असल्यामुळेच त्यांची गोरगरीब जनतेचा कैवारी अशीही संपूर्ण तालुक्यात त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या सेवाभावी स्वभामुळेच तसेच वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करत असल्यामुळेच धोपेश्वर जि.प.गटात भाजपा पक्षासहीत विरोधी पक्षातील मतदारांची देखील अभिजीत गुरव यांना आपला हक्काचा उमेदवार म्हणून मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
विशेषतः कोरोनाच्या काळात घरात बसून न राहता अनेकांना कोविड सेंटरमध्ये स्वतः नेऊन त्यांनी उपचारार्थ दाखल केले आहे. या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली असून, धोपेश्वर गटात भाजपा खूप चांगल्या स्थितीमध्ये वाढल्याचे त्यांनी सांगितले. या गटात प्रत्येक घराघरात संपर्कामुळे आपले जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून आपण काम केले आहे. त्यामुळे धोपेश्वर जि.प गटामधील जनता भाजपाच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि पक्षाने संधी दिली तर आपण त्याचे सोने करू असा विश्वास श्री. गुरव यांनी व्यक्त केला आहे.




