
जिल्हास्तरीय संरक्षण समिती सभा २८ ऑक्टोबर रोजी
रत्नागिरी, दि. १७: ):- जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक सभा मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी सदर बैठकीला आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.




