
मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे गोठ्याला आग लागून तीन म्हशींचा मृत्यू
मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे गोठ्याला आग लागून ३ म्हशी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये ३ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. आहे. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवार १४ रोजी रात्री महामुद अ. वहाब हसवारे यांनी शेतातील गोठ्यात डास व माशा पळवून लावण्यासाठी धुरांडी केली होती. ती पूर्ण विझल्याची खात्री झाल्यानंतर हसवारे घरी निघून गेले. प्राथमिक अंदाजानुसार, धुरामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे किंवा ठिणगीमुळे गोव्याला अचानक आग लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




