
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १२ वे मरणोत्तर देहदान…
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेतून शिष्यपरिवारातील
कै.सौ.भारती सुभाष डुबल.
वय – ६० वर्षे, राहणार – नाणीज, रत्नागिरी यांचे
दिनांक – १६/१०/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक १७/१०/२०२५ रोजी करण्यात आले.
कै. श्रीम. डुबल यांच्या पश्चात पती सुभाष डुबल, हेमंत डुबल, मुलगी प्रतिभा घाडगे, जावई प्रशांत घाडगे, सुन पूजा डुबल व नातू शिवांश डुबल हे आहेत.
सदर मरणोत्तर देहदान वेळी श्रीम. डुबल यांचे पती श्री. सुभाष डुबल, मुलगा श्री. हेमंत डुबल व नातेवाईक उपस्थित होते.
देहदानप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, नितीन रामेकर, मनिषा रामेकर, अनिता जाधव, रेश्मा दरडी आदी उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री.रेशम जाधव, शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, रुग्णवाहिका चालक – मयेकर व झोरे यांचे सहकार्य लाभले.




