
खेड तालुक्यातील आंजणारी-शेरेगांगुर्डेवाडी येथील तरूणाची गळफासाने आत्महत्या
खेड तालुक्यातील आंजणारी-शेरेगांगुर्डेवाडी येथील २८ वर्षीय तरूणाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अतिश अशोक दिवेकर असे मृत तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
www.konkantoday.com




