
रत्नागिरी.. करबुडे येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, एक मुलगी जखमी
बुधवारी अचानक रत्नागिरी परिसरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि शितलवाडी बौद्धवाडी या दोन वाड्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. यात करबुडे धनावडे वाडी येथे रमेश देमा धनावडे यांचे दोन बैल वीज पडून मरण पावले आहेत. तर अनेक घरांचे गोठ्यांची तसेच वाचनालय आणि शाळांची पडझड होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारी ढगांच्या गडगडटात, विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली. पावसासोबत वेगवान वारेही वाहिले. यामुळे अनके ठिकाणी पडझड झाली. या वादळी पावसाचा मोठा फटका रत्नागिरी तालुक्यातील करबुडे गावाला बसला. येथील अनेक घरे गोठे यांची पडझड झाली. करबुडे धनावडे वाडी येथे रमेश देमा धनावडे यांचे दोन बैल वीज पडून मरण पावले आहेत. त्याशिवाय गावातील करबुडे आणि शितपवाडी आणि बौद्धवाडी येथे विजा आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये येथील एकूण १४ ते १५ घरे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. करबुडे मुळगाव येथे सुनील तांबे यांच्या 13 वर्षे मुलीच्या अंगावर वीज पडून ती जखमी झाली




