
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानमार्फत १९ ऑक्टोबर रोजी किल्ले रत्नदुर्ग महादरवाजा संवर्धन मोहीम
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या रत्नागिरी विभागामार्फत येत्या रविवारी (१९ ऑक्टोब) रोजी सकाळी ८ वाजता किल्ले रत्नदुर्ग महादरवाजा संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरापासून जवळच असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील महादरवाजा, हनुमान मंदिर येथे ही महादरवाजा संवर्धन मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी ८३७९०१२३४७, ९९२०९०५९२०, ७६६६७०८२०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे




