
दिवाळीच्या तोंडावर आज दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान
गेले काही दिवस दरम्याने हैरण झालेल्या रत्नागिरी कराना अचानक आलेल्या परतीच्या पावसाला तोंड द्यावे लागत आहे रत्नागिरी शहरात दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवाळी काही दिवसावर आल्याने रत्नागिरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत मात्र अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
आकर्षक कंदील, रांगोळी, पणत्या आणि इतर वस्तू विकण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने सजवली असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने व्यापाऱ्यांचे नुकसान केले आहे. अनेक दुकानांमधील कागदी कंदील भिजून गेले तर काही ठिकाणी रांगोळीचे नुकसान झाले. पावसापासून मालाचा बचाव करण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती




