
वाटद -मिरवणे एमआयडीसीचा ठरावाचा निर्णय तत्काळ रद्द करा, मिरवणे ग्रामस्थांचे निवेदन
ग्रुप ग्रामपंचायत वाटद-मिरवणे येथे १२ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत चुकीच्या पद्धतीने आणि ग्रामस्थांना अंधारात ठेवून सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे मंजूर करण्यात आलेल्या एमआयडीसी समर्थनाचा ठराव तत्काळ रद्द करण्यात यावा असे निवेदन मिरवणे ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांना दिले.
तंटामुक्ती अध्यक्ष निवडक या उद्देशाने ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार या बाबी निवेदनात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
सदर एमआयडीसी प्रकल्पास गावातील ८० ते ९० टक्के ग्रामस्थांचा तीव्र विरोध असूनही त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे तीव्र असंतोष व नाराजी निर्माण झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
प्रांताधिकारी देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ग्रामसभेचे ठराव रद्द करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून केली जाते. त्यामुळे हे निवेदन जि.प.कडे पाठवण्यात येणार आहे.www.konkantoday.com




