
जेलरोडच्या कंपाऊंडचे काम पूर्ण होवूनही उर्वरित वाळू व चिरे रस्त्यावरच, नगरपरिषदेचे दुर्लक्षरत्नागिरीतील दुचाकी वाहन चालकांचा प्रवास होतोय धोकादायक
गेले तीन चार महिने रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रत्नागिरी शहरवासिय व वाहनचालक हैराण झाले होते. मात्र आता उघाडी पडताच रत्नागिरी नगर परिषदेकडून रस्त्यातील खड्ड्यांवर नाशिकची मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी या मलमपट्टीला लेव्हल नसल्यामुळे वाहनचालकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यातच मोठ्या प्रमाणावर रोड टॅक्स भरणार्या वाहनचालक व दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे पाहिले जात नसल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी रत्नागिरी जेल रोडच्या कंपाऊंडच्या भिंतीचे काम करण्यात आले त्यावेळी कंत्राटदाराने यासाठी वापरण्यात आलेली वाळू व चिर्याचे मटेरियल रस्त्यावरच ठेवले होते. त्यानंतर या कंपाऊंड वॉलचे प्लास्टरींगचे काम पूर्ण झाले. मात्र रस्त्यावर वाळूचा व चिरे लावल्याचा ढिगारा तसाच आहे. भर रस्त्यात मुळात अशा रितीने माल ठेवण्यास संबंधितांना परवानगी कुणी दिली आणि आता काम आटपूनही मटेरियल रस्त्यावर टाकून जाणाऱ्या कंत्राटदार यांच्यावर कारवाई होणार की नाही हा प्रश्न आहे नगरपरिषदेचे प्रशासन त्याकडे ढुंकून बघत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या अशा प्रकारे रस्त्यावरच करण्यात येणार्या अतिक्रमणामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठेवलेले हे अतिक्रमण तातडीने हलविण्यात यावे अशी वाहनधारकांची मागणी आहे




