
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; १०वी अन् १२वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
पुणे: एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी (SSC)आणि बारावी बोर्डाच्या (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, 12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत(Pune) घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीच्या फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.
.




