
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलावर्गामध्ये नाराजी
वाशिष्ठी नदीत पाण्याचा विसर्ग करा, असे पत्र नगर परिषदेने कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाला दिले आहे. सध्या नदी कोरडी पडत असल्याने त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना शोधण्यावर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. तसेच कोळकेवाडी येथील वीजनिर्मितीही कमी झाल्याने तेथून वाशिष्ठीत होणारा विसर्गही कमी झाला ाअहे. याचा परिणाम म्हणून वाशिष्ठी नदी कोरडी पडत आहे. याचा फटका गोवळकोट येथून गोवळकोट, कोवळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, अर्धी बाजारपेठ या अर्ध्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. या भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलावर्गामध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याकडे लक्ष दिले आहे.www.konkantoday.com




