
नांदिवडे समुद्रकिनारी माशांच्या मृत्यूप्रकरणी प्रदूषण मंडळाकडे तक्रार
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनारी होणार्या माशांच्या मृत्यूप्रकरणी नांदिवडेवासियांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. कंपन्यांमधून समुद्रामध्ये सोडण्यात येणार्या पाण्यामुळे माशांचा मृत्यू होत आहे. तसेच या ठिकाणचे मासे खाल्ल्याने लोक आजारी पडत आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेवून समुद्रात सोडण्यात येणारे दुषित पाणी बंद करावयास सांगावे, अशी मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com




