
राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी चिपळूणच्या दिशा पातकरची निवड
मुख्यालय, जम्मू-काश्मीर तसेच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ साठी चिपळूणची कन्या दिशा दीपक पातकर हिची पंच म्हणून निवड झाली आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि. १० ते दि. १४ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी निवड झालेली दिशा ही पोलीस एकमेव महिला पंच आहे.
www.konkantoday.com




