
आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था कोकण विभागाच्या माणिकमोती दिवाळी अंकाचे रत्नागिरीत प्रकाशन
रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था कोकण विभागाच्या माणिक मोती या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे उत्साहात झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डाॅ. चित्रा गोस्वामी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि देवी सरस्वतीच्या फोटोला हार घालून कार्यक्रम सुरू झाला. आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्ष ऋतुजा उमेश कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्या अर्चना देवधर, उमा जोशी, उमा देवळे यांच्यासह सुखिता भावे, कुंदा बापट, लता जोशी, राधिका आठल्ये, प्रतिभा मराठे, सौ. टेंगशे उपस्थित होत्या. आम्ही सिद्ध लेखिका संस्थेने कोकणच्या साहित्यिक महिलांना एकत्रित घेऊन काढलेल्या या दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.
कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी व डाॅ. चित्रा गोस्वामी या दोघींनी या अंकाचे अनावरण केले. ऋतुजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उमा जोशी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर सुनेत्रा जोशींनी आपले मनोगत व्यक्त करताना आजही छापील अंकाची कशी गरज आहे, हे सांगितले. अंकाचे प्रकाशन झाल्यावर प्रमुख अतिथी डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या कार्याचे कौतुक केले.




