
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यतर्फे भव्य दीप उत्सव
पुणे : मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य दीप उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत श्री तिर्थक्षेत्र भिवंडी मराडेपाडा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले शिवछत्रपतींचे पहिले भव्य दिव्य आणि प्रशस्त शिव मंदिर या ठिकाणी दिवाळीचे औचित्य साधून भव्य दीप उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवकार्य करण्यासाठी कायम तत्पर असते. मराठा समाजातील रोजगार, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन, त्याचबरोबर सामाजिक कार्य, नोकरी संदर्भात कामेही संघटना करते.
शिवक्रांती प्रतिष्ठान आणि मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला होता. यासाठी शिव क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वस्त डॉ. राजू भाऊ चौधरी, मंदिर विश्वस्त विजय गोडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर मराठा शिवमुद्रा संस्थापक अमित चव्हाण उपस्थित होते.




