मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने- सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन व जागरुकता कार्यक्रम


शनिवार दिनांक – 11 ऑक्टोबर 2025 रोजी मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने- सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन व जागरुकता कार्यक्रम डॉ. भास्कर जगताप जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी, जिल्हा शासकीय रुग्णालय ,रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल मा. डॉ. संदिप पटवर्धन सर, पेडिॲटिक आर्थोपेडिक, संचिती हॉस्पिटल, पुणे, डॉ. लीना श्रीवास्तव मॅडम न्युरो डेव्हलपमेंट व मा. सलोनी राजे न्युरोफिजिओथेरेपिस्ट यांनी सेरेब्रल पाल्सी आजाराच्या निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, डॉ. अर्जुन सुतार, मुकुल माधव फाउंडेशन रत्नागिरी चे डॉ. अनुप करमरकर, श्री. अभिजीत साळवी, बबलु मोकळे हे उपस्थित होते. तसेच डॉ. शाहीन पावसकर बालरोगतज्ज्ञ व जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील परिचारिका कॉलेज च्या विद्यार्थी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सेरेब्रल पाल्सी या आजाराची मुख्य लक्षणे – Main Symptoms – म्हणजे हालचाल आणि समन्वयातील अडचणी, जसे की, स्नायूंची ताठरता किंवा सैलपणा असंतुलन आणि अनैच्छिक हालचाली. याव्यतिरिक्त बोलणे, गिळणे खाणे, झोपणे किंवा डोळे नियंत्रित करणे यासारख्या कार्यांमध्ये अडचणी येऊ शकते. तसेच काही प्रकारांमध्ये झटके आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील दिसून येतात. सेरेब्रल पाल्सी (सीपी) ही एक न्युरोलॉजिकल स्थिती आहे जी स्नायूंच्या टोन किंवा हालचालींच्या विकाराच्या समस्या म्हणून प्रकट होऊ शकते. गर्भाच्या विकासादरम्यान मेंदूला झालेल्या नुकसानाचा किंवा मेंदूच्या विकासावर परिणाम करणाऱ्या इतर विकासात्मक अपंगत्वाचा हा परिणाम आहे. सीपीची लक्षणे बालपणात लवकर दिसून येतात आणि व्यक्ती नुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. सीपीचा मुख्य परिणाम असा आहे की तो स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. याचा परिणाम मेंदूच्या जवळच्या भागांवर आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षमतांवर देखील होऊ शकतो. सीपीमुळे एखाद्या बाळाला बौद्धिक अपंगत्व येऊ शकते. परंतु वेळीच उपचाराने आणि थेरपी ने हा आजाराची तीव्रता कमी होऊ शकते.
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील डिईआयसी विभागात विशेषज्ञ यांच्याकडून विविध प्रकारच्या 0 ते 6 या वयोगटातील मुलांच्या जन्मतः होणाऱ्या आजाराचे वेळीच निदान करून पुढील (शस्त्रक्रिया किंवा थेरपी)उपचारासाठी बालकांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. जिल्हा शासकीय रुग्णालय,रत्नागिरी येथील डिईआयसी विभागात दिल्या जाणाऱ्या या सेवांचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा असे डॉ. विकास कुमरे अति. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button