
राजापुरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आ. हुस्नबानू खलिफेंची एन्ट्री होण्याची शक्यता
राजापुरात नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या आरक्षण प्रक्रियेनंतर राजापुरात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकंदरित नगराध्यक्षपदाचे पडलेले महिला आरक्षण आणि दहा प्रभागांतील वीस उमेदवारांच्या पडलेल्या आरक्षणानंतर आता नगराध्यक्षपदासाठी प्रबळ महिला उमेदवारांच्या नावाची चाचपणी राजकीय पक्षांतून केली जात असतानाच कॉंग्रेसमधून विधान परिषदेच्या सदस्या राहिलेल्या माजी नगराध्यक्ष ऍड. सौ. हुस्नबानू खलिफे यांचे एक मोठे नाव पुढे येत आहे.. सौ. खलिफे ह्या यापूर्वी सन २००४ मध्ये लोक नियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. यंदाची निवडणूक अतीशय तुल्यबळ आणि अटीतटीची होण्याच्या शक्यतेतून त्यांना उमेदवारी स्वीकारावी यासाठी कॉंग्रेसमधून त्यांच्याकडे गळ घातली जात आहे मात्र त्यांची अद्याप स्पष्टता झालेली नाही.
www.konkantoday.com




