
मराठा विरुद्ध कुणबी संघर्ष चिघळणार? आझाद मैदानात कुणबी समाजाचा एल्गार
राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी जीआर काढून मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या पूर्वजांच्या नोंदीत ’कुणबी’ किंवा ’मराठा-कुणबी’ असल्याचा उल्लेख आहे, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची तरतूद केली. हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर शोधलेल्या ५८ लाख नोंदींमुळे लाखो मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, यामुळे ओबीसी प्रवर्गातील मूळ कुणबी आणि इतर जातींना धोका निर्माण झाल्याची भिती कुणबी समाजामध्ये आहे. कुणबी समाजाने राज्य सरकारच्या जीआरचा निषेध केला. आझाद मैदानात कुणबी समाजाने एल्गार मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
www.konkantoday.com




