
पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मंडणगड येथे जाऊन नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटनासंदर्भात मध्यरात्री १२ वाजता पाहणी करून घेतला आढावा
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जर्मनी दौऱ्यावरून परतताच थेट मंडणगड येथे होणाऱ्या नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटनासंदर्भात मध्यरात्री १२ वाजता पाहणी करून आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुखदेव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




