
मंडणगड न्यायालय इमारत उदघाटनाला १२ रोजीचा मुहूर्त
मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेल्याने या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी १२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्त काढण्यात आला आहे. या संदर्भातील संकेत बरिष्ठ पातळीवरुन प्राप्त झाल्याने प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. सरन्यायाधीश भूषण गबई व मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या उदघाटन सोहळ्याची तयारी सर्व पातळीवरुन सुरू झाली असली तरी याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
इमारतीचे उदघाटन, न्यायालयाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण हा मुख्य कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी न्यायालय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसाचे वाढलेले प्रमाण व इमारतीचे अपूर्ण राहिलेले काम लक्षात घेऊन हा मुहूर्त लांबणीवर पडला होता.
www.konkantoday.com




