
जिल्हा परिषदा व पंचायत समितीजागांच्या आरक्षणासाठी सोमवारी सभा
रत्नागिरी, दि. 9 ):- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित केली आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरी-जिल्हा नियोजन समिती सभागृह, रत्नागिरी तहसिल कार्यालय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे सभा होणार आहे. मंडणगड पंचायत समिती-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मंडणगड. दापोली पंचायत समिती-नवभारत छत्रालय, शिंदे सभागृह दापोली. खेड पंचायत समिती -श्री काळकाई मंदिर सभागृह पहिला मजला, भरणे नाका, खेड. चिपळूण पंचायत समिती-छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती चिपळूण. गुहागर पंचायत समिती-पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, गुहागर. रत्नागिरी पंचायत समिती-शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी. संगमेश्वर पंचायत समिती-छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख). लांजा पंचायत समिती-तहसीलदार कार्यालय सभागृह लांजा. राजापूर पंचायत समिती-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद राजापूर, मुंबई गोवा महामार्ग नजीक, राजापूर.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.




