
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील एमबीबीएसच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४३ पदे भरली
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातील एमबीबीएसच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४३ जागा भरण्यात आल्या आहेत. आणखी ६० जणांची प्रतीक्षा यादी जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले की, दापोली, कळंबणी, कामथे, राजापूर येथील उपजिल्हा रुग्णालये याशिवाय पाली, लांजा, देवरुख, गुहागर, मंडणगड, संगमेश्वर, रायपाटण यासारख्यां ग्रामीण रुग्णालयात मिळून एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची ४३ पदे भरली गेली आहेत असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात सेवेची संधी मिळावी यासाठी आणखी ६० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व प्रतीक्षा यादीवर आहेत. जिल्ह्यात हजर झालेले सर्व डॉक्टर त्यांच्या कामाच्या ठिकाणी टिकून राहावेत यासाठी प्रशासन पातळीवर योग्य ती मदत, आधार दिला जात असतो. कोठेही वादाचा मुद्दा उपस्थित झाला तर त्याची सोडवणूक वरिष्ठ म्हणून आपण करू असा विश्वास त्यांना देण्यात आला आहे.
www.konkantoday.com




