
अद्यासा दासचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुयश
रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा सन २०२५-२६ दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती,. या स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूल, गयाळवाडी (खेडशी, रत्नागिरी) या प्रशालेतील इयत्ता नववीमधील अद्यासा अरुणकुमार दास या मुलीने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.




