
गुहागर तालुक्यात “मनसे” पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आणि जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन पदनियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये जानवळे गाव शाखाध्यक्षपदी सुशांत कोळंबेकर यांची फेरनिवड करण्यात आली.
जानवळे शाखा उपाध्यक्षपदी प्रवीण लांजेकर, तर जानवळे गाव गटाध्यक्ष राहुल रहाटे यांची, जानवळे गाव बुथ प्रतिनिधी विजय शिंदे यांची निवड करण्यात आली. या सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव उपस्थित होते.




