
खेड तालुक्यातील शिरगावच्या डुबी धरणात मगरीचा म्हशींवर हल्ला
खेड तालुक्यातील शिरगाव येथील डुबी धरणात मगरीच्या हल्ल्यात म्हशी जखमी झाल्या आहेत. बागवाडी येथील शेतकरी दिनकर शंकरराव भोसले यांनी आपल्या मालकीच्या म्हशी धरणातील पाण्यात सोडल्या होत्या. यावेळी १० फुटी मगरीने म्हशींवर हल्ला केला. ही बाब भोसले कुटुंबियांना समजताच त्यांनी याबाबत सरपंचांना कळवले, धरणात मगरीचा वावर वाढल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com




