
चिपळूण कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर डागडुजी सुरू
चिपळूण शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, नादुरूस्त गटारे, रस्त्यावर साचणारे पाणी आणि घरांमध्ये शिरणारे पावसाचे पाणी याविरोधात येथील कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय महामार्ग उपविभागावर धडक देत तातडीने उपाययोजनेची मागणी केली होती. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता. या इशार्याची गंभीर दखल घेत शहरातील महामार्ग समस्यांबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कॉंग्रेसने केलेल्या दबावामुळे नॅशनल हायवे विभागाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कडक सूचना देत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा आदेश दिले असून, कामास त्वरित सुरूवात देखील करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




