
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा व्यवसायाने वकील आहे. त्याचे नाव राकेश किशोर आहे. “सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही.” अशी घोषणाही आरोपीने दिल्याची माहिती समोर आली आहे.सरन्यायाधीश गवई या काळात पूर्णपणे शांत राहिले. वकील राकेश किशोर यांना न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले की अशा घटनांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. “तुम्ही लोकांनी तुमचा युक्तिवाद सुरू ठेवावा.” असे ते म्हणाले. नवी दिल्ली जिल्हा डीसीपी देवेश महाला, सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेचे डीसीपी जितेंद्र मणी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयात उपस्थित आहेत. आरोपी वकिलाची चौकशी सुरू आहे.




