
क्रिकेट असोसिएशनची बैठक असोसिएशन चे अध्यक्ष, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न
लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट असोसिएशनची महत्वाची बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत स्थानिक खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक सुविधा, ग्रामीण पातळीवर क्रिकेटचा प्रसार, तसेच स्पर्धांचे आयोजन याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आमदार किरण सामंत यांनी खेळाडूंसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले. तसेच तरुणाईला क्रीडाक्षेत्राकडे वळविण्यासाठी क्रिकेटसह विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत असोसिएशनचे पदाधिकारी, स्थानिक खेळाडू आणि क्रीडा प्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. निर्णय प्रक्रियेत सर्वांच्या मतांचा आदर राखत आगामी क्रीडा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.




