
अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना पालकमंत्री डाॕ सामंत यांच्या हस्ते शनिवारी नियुक्ती पत्रांचे वितरण
रत्नागिरी, दि. 3 :- शासनामार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर अनुकंपा तत्वावरील आणि सरळ सेवा भरती करण्यात येत आहे. या अनुषंगाने उद्या शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना व लिपिक टंकलेखक पदावर उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
सरळसेवा व अनुकंपा तत्वानुसार जिल्ह्यात एकूण 136 उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या गट क वर्गामध्ये 112 व गट ड वर्गातील 1 उमेदवारांचा समावेश आहे. तसेच अनुकंपा तत्वावर गट क वर्गातील 3 व गट ड वर्गातील 20 उमेदवारांची भरती करण्यात येत आहे.
सरळसेवा नियुक्ती गट क जिल्हाधिकारी कार्यालय 46, जिल्हा पुरवठा कार्यालय 19, जिल्हा परिषद 10, अधिक्षक अभियंता सा.बां.मंडळ 10, विद्युत निरीक्षण विभाग 2, राज्य उत्पादन शुल्क 3, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय 1, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 7, जिल्हा पोलीस अधिक्षक 6, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 1, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 2, जिल्हा जलसंधारण मृद व जलसंधारण 1, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण कार्यालय 3, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1
सरळसेवा भरती गट ड जिल्हा परिषद 1.
अनुकंपा नियुक्ती गट क जिल्हाधिकारी कार्यालय 1, जिल्हा पोलीस अधिक्षक 1, रत्नागिरी पाटबंधारे विभाग कुवारबाव 1.
अनुकंपा भरती गट ड जिल्हाधिकारी कार्यालय 8, जिल्हा परिषद 3, अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ 5, जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था 1, कार्यकारी अभियंता गुणनियंत्रण विभाग अलोरे 1, जिल्हा पोलीस अधिक्षक 1, रत्नागिरी पाटबंधारे विभाग कुवारबाव 1.




