
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प करत आजची ग्रंथ पूजा:- दीपक पटवर्धन

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नवीन वास्तू मध्ये दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्रंथ पूजन करण्यात आले.
१ डिसेंबर २४ रोजी नूतन बांधकाम करण्यासाठी ग्रंथसंपदा वाचनालया बाहेर नेण्यात आली होती आणि अत्यंत वेगाने नवीन बांधकाम करण्यात आले फक्त ९ महिन्यात ४००० चौ फू. बांधकाम पूर्ण करत आता तळमजला वापरा साठी सज्ज होताच आज वाचनालयातील १ लाख पुस्तकांपैकी ७२ हजार च्या घरात पुस्तके वाचनालयात स्थानपन्न झाली हा क्षण खूप मौल्यवान होता.

२०० वर्षाच्या उंबरठ्यावर नवी प्रशस्त वास्तू
२०० वर्षाच्या उंबरठ्यावर हे वाचनालय उभे आहे. अश्यावेळी नव्याशतकाची सुरवात करताना ३०० वर्षाच्या मार्गक्रमणाचा मार्ग सुकर व्हावा या दृष्टीने योजना करत नवी भव्य आधुनिक वास्तू उभारण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा साक्षीदार
रत्नागिरी नगरीचे वैभव, इतिहासाचे साक्षीदार समृद्ध ग्रंथसंपदेचे धनी राहिलेले हे ग्रंथमंदिर उदयायवत पद्धतीने उभे करण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे जाताना ग्रंथसंपदा वाचनालयात स्थानापन्न झाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला.
१ वर्षात वास्तू उभारण्याचा संकल्प पूर्ण केला
जुन्या इमारतीला निरोप देतानाच वर्षभरात वाचनालय नव्या इमारतीत सुरू करण्या चा संकल्प जाहीर केला होता आणि आता केवळ ९ महिन्यात हा शब्द खरा ठरत आहे. १२ ऑक्टोबर रोजी वाचनालयाचा तळ मजला पूर्ण सज्ज होऊन नियमित वाचनालय नव्या वास्तूत कामकाज चालू करेल.
अद्ययावत प्रशस्त भव्य वास्तू
प्रशस्त कार्यालय. डिजिटल रूम उत्तम पुस्तक मांडणी वाचकाना बसून पुस्तक हाताळता येतील अशी व्यवस्था भरपूर प्रकाश आणि हवेशीर असणार वातावरण वाचकाला नक्कीच वेगळी अनुभूती देईल असा विश्वास दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
ज्ञान सांस्कृतिक ग्रंथ केंद्र
आज सरस्वतीपूजन करताना हे महाराष्ट्रातले सर्वात जुने पण सर्वात अद्ययावत असे बहुविध ज्ञान आणि संस्कृती केंद्र म्हणून विकसित करण्या चा मनोदय असल्याचे दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
प्रयत्नपूर्वक निधी उभारून २ कोटींच्या घरात खर्च
या वाचनालया ची उभारणी करण्यासाठी उभा केलेला निधी प्रयत्नपुर्वक उभा केला आहे आज पर्यंत २ कोटींच्या घरात काम झाले आहे. कोणत्याही सार्वजनिक संस्थेला अभिमान वाटावा अश्या वेगाने आणि उत्तम प्रतीचे भव्य असे वास्तू निर्माण करता आले याचे समाधान लाख मोलाचे असल्याचे दीपक पटवर्धन म्हणाले.
अनेक मान्यवरानची उपस्थिती
आजच्या ग्रंथ पूजना साठी. दीपक गद्रे, रुपेश साळवी, सुहास विद्वांस, सौ. प्रभुदेसाई, श्रीमती दामले, सौ आठवले, उमेश कुलकर्णी, अर्जुन कुलकर्णी, श्री लेले सर वैभव पटवर्धन सौ अंकिता पटवर्धन तसेच व्यवस्थापक मंडळ सदस्य व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.




