50 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्याग्रंथांच्या यादीबाबत आक्षेप 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवावा


रत्नागिरी, दि. 1 ) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1 हजार 388 ग्रंथांची यादी (मराठी ७४९, हिंदी २९७, इंग्रजी ३४२) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in संकेतस्थळावर २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आलेली आहे. या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सुचना/ हरकती/ आक्षेप असल्यास १५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा director.dol@maharashtra.gov.in ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त ससूचनांचा हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
सदर ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान २५ टक्के सूटदराने वितरीत करणे बंधनकारक आहे. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button