
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 30 ) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 12 वाजता रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 1 वाजता काळबादेवी पुलासंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 2 वाजता रत्नागिरी न.प. अंतर्गत विविध विकासकामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 5 ते रात्रौ 9 वाजता रत्नागिरी शहरातील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी (स्थळ : रत्नागिरी शहर) रात्रौ 9 वाजता “रत्नागिरी दांडिया नाईटस्” येथे भेट (स्थळ : विवेक हॉटेल, माळनाका ) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000




