जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणदापोली नागरिकांचा मागासवर्ग ; राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिलाचिपळूण, गुहागर, रत्नागिरी सर्वसाधारण; मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला


रत्नागिरी, दि. 30 ) : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी सर्वसाधारण तर मंडणगड संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरले.
आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार सर्वसाधारण मीनल दळवी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रथम माहिती दिली. त्यानंतर अनन्याच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button