
भगवतीनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत आरोग्य शिबिर
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत गाव भगवतीनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिलांसह ग्रामस्थांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषत: नेत्रतपासणी करून अनेकांना दृष्टीदोष निदान झाले. गरजूंना त्याचे नंबर प्रमाणे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मोतीबिंदू दोषीत रुग्णांची जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
स्वस्थ नारी सशक्त परिवार विशेष अभियान अंतर्गत महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. महिला मध्ये जनजागृती करून महिलांनी कश्याप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी त्या बद्दल समुपदेशन करण्यात आले.अभियानामध्ये महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, ॲनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड ekyc करण्यात आले
या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, नेत्र चिकित्सक डॉ. संदीप उगवेकर, आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर आरोग्य सहाय्ययिका श्रीम. सीमा पाडवी, समता फाउंडेशन मुंबई चे श्री. शेट्ये, cho अक्षता शिर्षेकर, मनाली तारवे, माधुरी ठाकरे आरोग्य सेवक श्री सुरेश अंबुरे, आरोग्य सेविका श्रीम. दीपा गावडे, अश्विनी गोवळकर, अर्चना आपकरे, स्वाती कदम लॅब टेक्निसियन श्रीम श्रुतिका मोहित गट प्रवर्तक श्रीम आढाव सर्व आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थित होते. 129 नागरिकांची या वेळी तपासणी करण्यातली त्यातील 9 लोकांची ecg द्वारे तपासणी करण्यात आली. 48 नागरिकांची नेत्र तपासणी करून पैकी 8 नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. 98 नागरिकांच्या रक्ताच्या तपासन्या करण्यात आल्या
या उपक्रमामुळे महिलांसह ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, वेळेवर उपचाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
👉 या शिबिरामुळे आरोग्य सेवांचे महत्त्व गावागावात पोहोचत असून “सुदृढ नारी – सशक्त परिवार” हा संदेश अधिक प्रभावीपणे रूजत आहे.
–




