अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेची उद्घोषणा

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेची उद्घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉ. उदय सामंत यांनी केली आहे. गतवर्षी प्रमाणेच रत्नागिरी तालुक्यासाठी मर्यादित असलेली ही स्पर्धा २०२५ – २६ या वर्षीही मोठ्या उत्साहात आयोजित करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
गतवर्षी या स्पर्धेला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण ४७ नाटकांचे प्रत्यक्ष सादरीकरण झाले. सन २०२५-२६च्या स्पर्धेची सुधारित नियमावली आणि प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत. जास्तीत जास्त उत्सव मंडळांनी उत्सवासाठी निर्मित केलेले नाटक हे या स्पर्धेत सादर करावेच, असे आवाहन करत लोककलेपाठोपाठ नाट्यकला ही देखील इथल्या संस्कृतीचा भाग असून आपण तो वारसा जपत आहोत, असे उद्गार पालकमंत्री सामंत यांनी या स्पर्धेबाबत काढले. स्पर्धेची संकल्पना व्यक्त करत असताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे आणि गतवर्षी सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मींचे कौतुक केले आहे. तसेच या वर्षीची स्पर्धा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत चालणार असल्याचे देखील त्यांनी घोषित केले.
स्पर्धा प्रमुख म्हणून अमेय धोपटकर काम पहाणार असून मुख्य समन्वयक म्हणून वामन कदम आणि सतीश दळी हे जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच स्पर्धेदरम्यान परीक्षकांच्या व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण नियोजन संतोष सनगरे पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अन्य माहितीसाठी खालील कार्यकारिणीचे पदाधिकारी अमेय धोपटकर (८८८८०३३६२१), श्रीमती अनुया बाम (९२८४७५२७८७) वामन कदम (९४२२६३८१८६), सतीश दळी (९४२२०५४१६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button