
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-भरणे रस्त्यालगतची अतिक्रमणे अखेर हटवली
रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे ते दापोलीपर्यंतच्या राज्य महामार्गातील कामासाठी भरणे येथे गटार खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामास सुरुवात करण्यापूर्वी रस्त्यालगतची सर्व अतिक्रमणे संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून हटवली. लवकरच राज्यमार्ग रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
भरणे येथील तालुका कृषी रोपवाटिकेसमोर व्यावसायिकांनी बस्तान ठोकले होते. रस्त्यालगत अनेक टपर्यांची उभारणी करण्यात -आली होती. शिवाय अनेक व्यावसायिक येथे तळ ठोकून होते. यामुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला होता.www.konkantoday.com




