
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमातील नियोजनात बदल.
1रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी 1 ऑक्टोबर ला ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो. त्या दिवसाचे अवचित्य साधून संघाच्या सभासदांचा सत्कार करतो. त्याप्रमाणे सर्व संबंधित ज्येष्ठ सभासदांना निमंत्रण पाठवले आहे. तथापि दि 25 सप्टेंबर 2025 ला हवामान विभागाने वर्तवलेला 26 ते 30 सप्टेंबर पर्यंतचा अतिवृष्टीचा अंदाज आणि त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या दक्षतेचा इशारा विचारात घेता 1 ऑक्टोबर च्या कार्यक्रमाला ज्येष्ठ आणि ज्येष्ठतम सभासदांच्या उपस्थिती बाबत आम्ही साशंक आहोत.
हवामानातील अनपेक्षित बदलाचा सiकल्याने विचार करून बुधवार दि. 1 ऑक्टोबर 2025 चा नियोजित कार्यक्रम स्थगित करून हाच कार्यक्रम रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनी म्हणजेच सोमवार दि 13ऑक्टोबर 2025 ला संघाच्या शिवाजी नगर येथील सभागृहात दुपारी ठीक 4.00 वाजता आयोजित करण्यात येत आहे. सर्व संबंधिताना दुरध्वनी /पत्रiद्वारे कळवीण्यात येत आहे.तरी संघाच्या सर्व सभासदांनी कार्यक्रमाच्या तारखेतील बदलाची कृपया नोंद घेऊन संघाला सहकार्य करावे असे संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने संघांचे अध्यक्ष सुभाष थरवळ कळवीत आहेत.




