
आयुष्यमान भारत योजनेत गरजुंपेक्षा सधन कुटुंबेच: नगरसेवक शशिकांत मोदी यांचा आरोप
चिपळूण: आयुष्यमान भारत योजनेंतर्गत शहरातील ११ हजार लोकांच्या झालेल्या यादीत लाभार्थींचा समावेश करण्यात आला असला तरी या लाभार्थ्यांच्या यादीत गरजुंपेक्षा व्यापारी, बिल्डर आदींचा समावेश दिसत आहे. यामुळे या योजनेच्या यादीचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारने भगव्या व पिवळ्या रेशन कार्डाना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जाहीर केली असून या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. मात्र यासाठी बनवण्यात आलेल्या लाभार्थींच्या यादीत गरीब कुटुंबापेक्षा सधन कुटुंबांचा समावेश अधिक दिसत असल्याने ही यादी बनवताना नेमके कोणते निकष लावले गेले याविषयी शंका निर्माण झाली आहे. चिपळूण शहरातील अनेक भागातील गरजू लाभार्थींचा यादीत समावेश नसल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com