
उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 27 ) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने पालीकडे प्रयाण. सकाळी ६.३० वाजता पाली येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता अचानक नवरात्रोत्सव मित्रमंडळ, पाली आयोजित चिखल नांगरणी स्पर्धा येथे उपस्थिती (स्थळ : कोल्हापर्या, सुतारवाडी रोड, पाली) सकाळी ११.३० वाजता मारुती सुझुकी VICTORIS नवीन मॉडेलच्या लॉन्चींग कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जागृत मोटर्स प्रा. लि., प्लॉट नं. डीं- २५, एम.आय.डी.सी., मिरजोळे, रत्नागिरी) दुपारी १२ वाजता रत्नागिरी नगर परिषद आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी १ वाजता अल्पसंख्यांक सेल यांच्या समवेत आयोजित बैठकीस उपस्थिती (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी २ ते ४ वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी ४.१५ ते सायंकाळी ६ वाजता राखीव (स्थळ : एमआयडीसी विश्रामगृह, रत्नागिरी) सायंकाळी ६.३० वाजता ते ८.३० वाजता रत्नागिरी शहरातील नवरात्रौत्सव मंडळांना भेटी (स्थळ : रत्नागिरी शहर) रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव.
सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वा. रत्नागिरी येथून मोटारीने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा), गोवा कडे प्रयाण.
000




