
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -202528 सप्टेंबर ऐवजी होणार 9 नोव्हेंबर 2025 रोजी
रत्नागिरी, दि. 26 ) : राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण पूरजन्य परिस्थितीमुळे विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2025 ही परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर ऐवजी सुधारीत दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी, असे प्र.उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2025 ही परीक्षा रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी तालुक्यातील 02 उपकेंद्रावर दोन सत्रामध्ये (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 12.00) या वेळेत घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक
जिल्हयामध्ये निर्माण पूरजन्य परिस्थितीमुळे विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.
तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्र. मलोआ-1125/प्र.क्र.236/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्यात आली असल्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील पत्र क्रमांक एमजीएस-1923/सीआर-20/2023/तेरा, दिनांक 26 सप्टेंबर 2025 अन्वये कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2025 ही परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारीत दिनांकास म्हणजेच दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया, नोंद घ्यावी.
000




