
चिपळूण डीबीजे कॉलेजसमोर हाणामारी करणार्या विद्यार्थ्यांना पोलिसांची समज
सुसंस्कृत चिपळुणात भाईगिरी’ करणार्या विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकास भिडल्याची घटना शुक्रवारी शहरातील डीबीजे महाविद्यालयासमोर घडली होती. फिल्मी स्टाईलने झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप पसरला. याची दखल घेत पोलिसांनी त्या तरुणांना कडक शब्दात समज दिली आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये बसण्यावरुन या वादाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे येत आहे. मारामारी करणारे विद्यार्थी १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यातील एका गटातील विद्यार्थ्यांनी दुसर्या गटातील विद्यार्थ्यांना सर्वांसमोर जबरदस्तीने उठाबशा काढण्यासाठीचा दम दिला जात होता. त्यांच्यातील वाद विकोपाला जाताच एक-दोन विद्यार्थ्यांनी तीन-चार विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अगदी मुंबई-गोवा महामार्गावरच्या सर्व्हिस रोडलगत एकमेकांस लोळवून मारहाण करण्यात आली.
www.konkantoday.com




