
चिपळूण येथील मटण-मच्छी मार्केट इमारतीच्या दुरुस्तीतील बोगस काम तत्काळ थांबवा
चिपळूण येथील नगर पालिकेकडून सुरू असलेले मतृण-मच्छी मार्केट इमारतीतील दुरुस्तीचे काम बोगस होत असल्याचा आरोप करत त्यावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाव्दारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नगर पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे २० वर्षे पडीक असलेली ही इमारत नव्याने दुरुस्त करून व्यावसायिक गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्याचे प्रयत्न नगर चिपळूण शहरातील मटण-मच्छी मार्केट इमारतीत सुरू असलेले रंगरंगोटीचे काम.
पालिकेने सुरू केले आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेल्या सूचना व उपाययोजना न पाळता रोजंदारीवरील अकुशलमजुरांकडून रंगरंगोटी व दुरुस्ती सुरू आहे.
www.konkantoday.com




