
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीनेपंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २७ सप्टेंबर रोजी पटवर्धन हायस्कूल येथे
रत्नागिरी, दि. २३ ) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पटवर्धन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, मारुती आळी, आठवडा बाजार शेजारी, नवीन इमारत, सी-विंग, ता.जि. रत्नागिरी आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी आपल्या आस्थापनातील रिक्त पदांची नोंद www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
या पोर्टलवर उपलब्ध युझर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून रिक्त पदे अधिसूचित करून रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष निवड करून रोजगार देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा आस्थापनांनी त्वरित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी येथे संपर्क साधावा व रोजगार मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
000




