
स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गटाची महावितरणवर धडक
महावितरणने देशभरात सुरू केलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन पुकारले आहे. या योजनेचा निषेध करत मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील महावितरण कार्यालयावर धडकला.
हा मोर्चा माजी खासदार विनायक राऊत, उपनेते तथा माजी आमदार बाळ माने आणि संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.




