
विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलवरुन दिल्लीला पोहचला 13 वर्षांचा मुलगा
देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीनवर अधिकाऱ्यांना या मुलाला प्रतिबंधिच क्षेत्रात फिरताना पाहिले आणि त्याची चौकशी केली त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे१३ वर्षांच्या या मुलाला गुपचूपपणे इराणला जायचे होते. परंतू तो चुकीने भारतात जाणाऱ्या विमानात अशा प्रकार लपला. त्यामुळे तो थेट दिल्लीला पोहचला. या घटनेनंतर काबुल एअरपोर्टवरील सुरक्षेसंदर्भात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार के.ए.एम. एअर फ्लाईट क्रमांक आर.क्यू-4401 ला काबुल ते दिल्ली यायला 94 मिनिटे लागली. या दरम्यान हा अफगाणी मुलगा 94 मिनिटे मिनिटे विमानाच्या पाठच्या चाकाच्यावरील भागात लपून राहिला. हे विमान भारतीय वेळेनुसार काबूलहून सकाळी 8:46 वाजता रवाना झाले आणि सकाळी 10:20 वाजता दिल्लीच्या टर्मिनल 3 वर पोहचले.
या अफगाणी मुलाने सांगितले की त्याने काबुल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवून प्रवेश केला. त्यानंतर विमान सुटण्याच्या वेळेत व्हीलमध्ये तो लपला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.




