
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षरुग्ण, नातेवाईकांसाठी आर्थिक पाठबळ देणारा मोठा आधार
रत्नागिरी, दि. 22 ):- जिल्ह्यातील रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा आर्थिक पाठबळ देणारा मोठा आधार ठरत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रतिक्रिया म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहे.
वॅनिश विजय मोर्ये – मी जैतापूर, होळी, येथील रहिवासी असून, माझे वडील विजय मोर्ये यांना मेंदुचा आजार झाला होता. त्यांच्यावर निर्मल हॉस्पीटल रत्नागिरी येथे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारासाठी २ लाख ५० हजार इतका खर्च होणार होता. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने हा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता. मला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची माहिती मिळताच तात्काळ अत्यावश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निथी कक्षात दिनांक २० जून रोजी सादर केला. कक्षातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत रक्कम १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. याबद्दल आम्ही खूप खूप आभार मानतो.
सायली संदीप ठिक – तिवंडेवाडी येथील राहणार असून, माझे वडील संदीप कृष्णा ठिक यांना मेंदुचा आजार झाला आहे. विन्स् हॉस्पीटल कोल्हापूर येथे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारासाठी ३ लाख २५ हजार इतका खर्च होणार होता. आमच्या कुटंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून हा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता. मला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची माहिती मिळताच तात्काळ अत्यावश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात दिनांक ९ जून रोजी रोजी सादर केला व कक्षातील कर्मचाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून रक्कम रु १ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली. याबद्दल मी खूप खूप आभार मानतो.
मोहम्मद उमर परकार – चिपळूण येथील रहिवासी असून, माझी सासू फातिमा गुलाम हाफिज झराम रा. महाड ता. महाड यांना गुडघारोपणसाठी त्यांच्यावर अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारासाठी रु १ लाख ९४ हजार इतका खर्च होणार होता. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून, सदरचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता. मी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात दि. २ जून रोजी अर्ज सादर केला व कक्षातील कर्मचारी यांनी तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत रक्कम रु. ५० हजारांची आर्थिक मदत मिळवून दिली. याबद्दल आम्ही खूप खूप आभार मानतो.
प्रदीप भोसले – माझे वडीलांची एका आजारामध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी ४ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्हाला ५० हजार रुपयांची सहाय्यता मिळाली. यामुळे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले. त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो.
संगीता राणे – माझे वडील गंगाराम राणे हे सांगली येथे ॲडमिट होते. त्यांना मदत मिळण्यासाठी मी रत्नागिरी येथून मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कार्यालयातून मदत मिळण्यासाठी अर्ज केला होता. मला १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते.
शशांक तानवडे – माझ्या मुलीच्या पायाचे हाड तुटल्यामुळे तिला शस्त्रक्रियेची गरज होती. माझी अर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी रत्नागिरी येथे अर्ज केला व तेथून मला तातडीची मदत रु. ७५ हजार रुपयांची मदत झाली. याबद्दल मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष येथे मला अनमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण अर्ज भरुन मला ही तातडीची ७५ हजार रुपये मदत झालेली आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.




