
राजापुरात मोकाट गुरांच्या समस्येवर ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याची मागणी
रस्त्यावर फिरणार्या मोकाट जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावस्तरावर समिती गठीत करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे १०० टक्के टॅगिंग करण्याच्या तसेच मोकाट गुरांच्या मालकांवर आवश्यकतेप्रमाणे कायदेशीवर कारवाई करण्याचेही सूचित केले. मोकाट गुरांची समस्या सोडविण्याकामी प्रशासनासह सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजापूर शहरास तालुक्यात रस्त्यावर ठाण मांडून बसणार्या मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस अधिक व्यापक बनत चालली आहे. सातत्याने वाहनांची रहदारी असलेल्या मार्गासह राजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरे रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघाताला आमंत्रण ठरते. त्यामुळे मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, मोकाट गुरांच्या समस्येची तत्काळ दखल आमदार किरण सामंत यांनी घेत प्रशासनाला तातडीची बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. जैसमिन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली.www.konkantoday.com




